सेलू तालुका तलाठी-मंडळ अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी सारिका हेडगे; सचिवपदी ओम कानडे

सेलू तालुका तलाठी-मंडळ अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी सारिका हेडगे; सचिवपदी ओम कानडे

✍️उत्तम लोखंडे 

 परभणी/सेलू

सेलू तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी मंडळ अधिकारी सारिका हेडगे, तर सचिवपदी ओम कानडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

सेलू येथे तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर सूर्यवंशी आणि जिल्हा सचिव राजकुमार चिकटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते आणि बिनविरोध करण्यात आली.

या निवडीत उपाध्यक्षपदी श्रीकिशन खंडागळे, कार्याध्यक्षपदी वैजनाथ आमदरे, सहसचिवपदी राहुल नाहेडे, तर कोषाध्यक्षपदी मिलिंद कुमार दवने यांची निवड झाली. तसेच दीपक गांगुर्डे, महेंद्र गाढे आणि किरण गोंगे यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली.

महिला प्रतिनिधी म्हणून प्रतिभा साखरे, दीपिका गायकवाड, वैष्णवी बन, मीना शिंदे, श्वेता भीमपल्लेवार आणि स्मिता हाकदळे यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागारपदी माधव कुरेवाड आणि ज्योती अडागळे यांची नियुक्ती करण्यात आली.

नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रशासकीय तसेच सेवाविषयक प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्याबरोबरच महसूल विभागातील कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संघटनेच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अडचणी, मागण्या आणि विविध प्रश्न शासनस्तरावर मांडण्यासाठी नूतन पदाधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतील.

दरम्यान, सेलू तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अध्यक्ष सारिका हेडगे, सचिव ओम कानडे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सहकारी व मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात येत असून, संघटनेच्या माध्यमातून सकारात्मक आणि प्रभावी कामकाज घडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl