वाढदिवसाला समाजसेवेची जोड; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सिताराम जाधव यांचा स्तुत्य उपक्रम



वाढदिवसाला समाजसेवेची जोड; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सिताराम जाधव यांचा स्तुत्य उपक्रम

मुंबई | मालाड प्रतिनिधी : 

वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याच्या उद्देशाने सातारा फाउंडेशन, दिंडोशी विभागाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सिताराम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वह्या वाटपाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

“वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एखाद्याच्या शिक्षणाला हातभार लावणे हीच खरी सामाजिक बांधिलकी,” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री. सिताराम जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. देविदास घरटे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी सिताराम जाधव यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

यानंतर पोलीस उपनिरीक्षक देविदास घरटे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचा विशेष ठरला. शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. रुपाली सकपाळ यांनी केले. यावेळी सिताराम जाधव यांच्या पत्नी सौ. सुषमा जाधव, मुलगा अक्षय जाधव आणि सून सौ. शिवानी जाधव उपस्थित होते.

तसेच स्वराज्य फाउंडेशनचे मार्गदर्शक श्री. लक्ष्मण जाधव, दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. देविदास घरटे, अध्यक्ष श्री. संजय जाधव, संतोष जाधव, गोविंद शिंदे, सोमराज शिंदे, सौ. ललिता सकपाळ, महिला शाखाप्रमुख सौ. आशाताई कदम, बबन चव्हाण, यशवंत चव्हाण, आनंद सकपाळ, योगेश शेलार, मारुती कदम तसेच वॉर्ड क्रमांक ३७ चे शाखाप्रमुख श्री. प्रदीप सावंत यांच्यासह विभागातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक कार्याचा गौरव

यावेळी श्री. लक्ष्मण जाधव यांनी सिताराम जाधव यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री. संजय जाधव यांनी सिताराम जाधव यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी कार्याचा आढावा घेत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे हा वाढदिवसाचा सोहळा केवळ शुभेच्छा, सत्कार आणि केकपुरता मर्यादित न राहता शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेचा संदेश देणारा उपक्रम ठरला.

आयोजनासाठी पदाधिकारी व सदस्यांची मेहनत

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय सकपाळ, सुरेंद्र जाधव, राजू जाधव, प्रदीप चव्हाण, एकनाथ कदम, रामचंद्र सकपाळ, सौ. गीता शेलार – महिला अध्यक्ष, सौ. भारती रिंगे, सुरेखा सणस, आरती जाधव, वंदना गोळे, संगीता उतेकर, कविता जाधव तसेच सातारा फाउंडेशन, दिंडोशी विभागातील सर्व पुरुष व महिला पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करत ‘सेवेतून समाधान आणि शिक्षणातून परिवर्तन’ हा संदेश देणारा सिताराम जाधव यांचा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच अनुकरणीय ठरला आहे. स्वतःच्या आनंदाला सामाजिक कार्याची जोड देत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योगदान देण्याची ही सकारात्मक परंपरा समाजात अधिक बळकट होण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl