राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून वसंत एकनाथ शिर्के यांची महाबळेश्वर तालुका OBC अध्यक्षपदी नियुक्ती; विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून वसंत एकनाथ शिर्के यांची महाबळेश्वर तालुका OBC अध्यक्षपदी नियुक्ती; विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

महाबळेश्वर प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सचिव वसंत एकनाथ शिर्के यांची महाबळेश्वर तालुका OBC अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र १० जुलै २०२६ रोजी प्रदान करण्यात आले असून, त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

नियुक्तीपत्रानुसार, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत जयवंतराव शिंदे तसेच सातारा जिल्हाध्यक्ष आ. बाळासाहेब पांडुरंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याची जबाबदारी वसंत शिर्के यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचविणे, OBC समाजाचे संघटन मजबूत करणे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रचार-प्रसार करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्यासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

वसंत शिर्के यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील नारायण जगताप यांनी शिर्के यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस लाख लाख शुभेच्छा दिल्या. तसेच पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे संपर्क प्रमुख (मीडिया) आदिनाथ कुसुम गायकवाड यांनीही शिर्के यांच्या नियुक्तीचे स्वागत करत त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

महाबळेश्वर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या वसंत शिर्के यांच्या या नियुक्तीमुळे पक्षाच्या OBC संघटनात्मक कामाला नवी दिशा मिळेल, तसेच ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl