चार महिन्यांतच नवीन संरक्षण भिंत कोसळली; कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

चार महिन्यांतच नवीन संरक्षण भिंत कोसळली; कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

प्रतापगड प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यातील घोडे पारुट येथे बस स्टॉपजवळ एप्रिल महिन्यात नव्याने बांधण्यात आलेली संरक्षण भिंत अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून संबंधित कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बस स्टॉप परिसरात नागरिकांची तसेच प्रवाशांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीने ही भिंत उभारण्यात आली होती. मात्र अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीतच ही भिंत कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आणि वापरण्यात आलेल्या साहित्याबाबत शंका उपस्थित होत आहेत.

सध्या महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे भिंत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नव्याने उभारण्यात आलेली संरक्षण भिंत इतक्या कमी कालावधीत कोसळणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुदैवाने भिंत कोसळली त्यावेळी परिसरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित कामाची गुणवत्ता तपासावी तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संरक्षणात्मक कामे उच्च दर्जाची आणि टिकाऊ पद्धतीने करण्यात यावीत, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl