अतिवृष्टीचा फटका! देवळीतील घरावर दरड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी

अतिवृष्टीचा फटका! देवळीतील घरावर दरड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी

महाबळेश्वर प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून, देवळी गावातील रहिवासी अशोक जाधव यांच्या घरावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अशोक जाधव यांच्या घराच्या आजूबाजूची माती खचून मोठी दरड थेट घरावर कोसळली. या दुर्घटनेत घराच्या संरचनेचे मोठे नुकसान झाले असून, कुटुंब भयभीत अवस्थेत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घर राहण्यायोग्य राहिले नसल्याची माहिती मिळाली आहे.

सततच्या पावसामुळे परिसरातील जमीन सैल झाली असून, आणखी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनीही या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा, नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून आर्थिक मदत द्यावी तसेच सुरक्षित पुनर्वसनाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातील अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. देवळीतील या घटनेमुळे पुन्हा एकदा डोंगरकडील वस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl