जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड; पत्रकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव


जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड; पत्रकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

मेढा | प्रतिनिधी

तालुक्यातील एकमेव नोंदणीकृत असलेल्या जावळी तालुका पत्रकार संघच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, राजकीय, प्रशासकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक प्रश्नांवरील अभ्यासू भूमिका, तळागाळातील विषयांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि निष्पक्ष वृत्तांकन यामुळे सादिक सय्यद यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जावळी तालुका पत्रकार संघ अधिक सक्षम आणि प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यावेळी संघाचे मार्गदर्शक दत्ता पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्राधान्याने वाचा फोडणे, त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारणे तसेच पत्रकारांच्या हितासाठी विधायक उपक्रम राबविणे, या बाबींना नव्या कार्यकारिणीकडून प्राधान्य दिले जाईल.

नवीन कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी संदीप माने, उपाध्यक्षपदी संतोष मालुसरे तर सचिवपदी विनोद वेंदे यांची निवड करण्यात आली.

निवडीनंतर अध्यक्ष सादिक सय्यद यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. पत्रकारांची एकजूट कायम ठेवून संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि समाजहिताच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संघाचे मार्गदर्शक इम्तियाज मुजावर, ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार, महेश बारटक्के, संजय शेलाटकर, बापू वाघ, मोहसीन शेख, विशाल जमदाडे, जुबेर शेख यांच्यासह संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सादिक सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघ पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करेल तसेच पत्रकारितेतील मूल्ये जपत समाजहिताच्या प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य अधिक जोमाने पुढे नेले जाईल, असा विश्वास पत्रकार आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl