मुसळधार पावसाचा मोठा फटका; म्हाते खुर्द येथे घराची भिंत कोसळून ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमीतासभर ढिगाऱ्याखाली अडकूनही मृत्यूशी झुंज देत स्वतःच बाहेर पडले; भिलारे कुटुंबाला तातडीच्या मदतीची मागणीजावली प्रतिनिधी :सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून त्याचीच प्रचिती म्हाते खुर्द येथे समोर आली आहे. सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, म्हाते खुर्द येथील रहिवासी मंगेश भिलारे यांचे वडील लक्ष्मण कृष्णा भिलारे हे दुपारच्या सुमारास घरी एकटेच होते. त्यावेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. सततच्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत अचानक कोसळली आणि लक्ष्मण भिलारे हे त्या ढिगाऱ्याखाली अडकले.घरात अन्य कोणीही नसल्याने त्यांना तत्काळ मदत मिळू शकली नाही. साधारणपणे तासभर ते विटा आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले होते. गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेतही त्यांनी मोठ्या धैर्याने आणि जीवाच्या आकांताने स्वतःला त्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी घराबाहेर पडून आपला जीव वाचवला.या घटनेत लक्ष्मण भिलारे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या मेढा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समोर येताच परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.भिलारे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जात असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घराची भिंत कोसळल्याने त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर पडला आहे. आगामी काळात आणखी पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.या घटनेची शासन प्रशासनाने तातडीने दखल घेऊन भिलारे कुटुंबीयांना आर्थिक मदत, घर दुरुस्तीसाठी विशेष अनुदान तसेच राहण्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जुन्या आणि जीर्ण घरांना धोका निर्माण झाला असून प्रशासनाने अशा घरांचे सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मुसळधार पावसाचा मोठा फटका; म्हाते खुर्द येथे घराची भिंत कोसळून ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी
तासभर ढिगाऱ्याखाली अडकूनही मृत्यूशी झुंज देत स्वतःच बाहेर पडले; भिलारे कुटुंबाला तातडीच्या मदतीची मागणी

मेढा प्रतिनिधी :

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून त्याचीच प्रचिती म्हाते खुर्द येथे समोर आली आहे. सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाते खुर्द येथील रहिवासी मंगेश भिलारे यांचे वडील लक्ष्मण कृष्णा भिलारे हे दुपारच्या सुमारास घरी एकटेच होते. त्यावेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. सततच्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत अचानक कोसळली आणि लक्ष्मण भिलारे हे त्या ढिगाऱ्याखाली अडकले.

घरात अन्य कोणीही नसल्याने त्यांना तत्काळ मदत मिळू शकली नाही. साधारणपणे तासभर ते विटा आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले होते. गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेतही त्यांनी मोठ्या धैर्याने आणि जीवाच्या आकांताने स्वतःला त्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी घराबाहेर पडून आपला जीव वाचवला.

या घटनेत लक्ष्मण भिलारे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या मेढा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समोर येताच परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

भिलारे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जात असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घराची भिंत कोसळल्याने त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर पडला आहे. आगामी काळात आणखी पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

या घटनेची शासन प्रशासनाने तातडीने दखल घेऊन भिलारे कुटुंबीयांना आर्थिक मदत, घर दुरुस्तीसाठी विशेष अनुदान तसेच राहण्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जुन्या आणि जीर्ण घरांना धोका निर्माण झाला असून प्रशासनाने अशा घरांचे सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl