इंडिया स्किल्स २०२६-२७ स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; सातारा जिल्ह्यातील युवकांना सहभागाचे आवाहनकौशल्याला राष्ट्रीय व्यासपीठ; विविध क्षेत्रांतील गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी
इंडिया स्किल्स २०२६-२७ स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; सातारा जिल्ह्यातील युवकांना सहभागाचे आवाहन
कौशल्याला राष्ट्रीय व्यासपीठ; विविध क्षेत्रांतील गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी
सातारा प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग तसेच भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'इंडिया स्किल्स २०२६-२७' या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कौशल्याचा राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अ. मु. पवार यांनी केले आहे.
देशातील विविध उद्योग, तंत्रज्ञान, सेवा, उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, हॉस्पिटॅलिटी, आरोग्य सेवा, बांधकाम, ऑटोमोबाईल आदी क्षेत्रांतील कौशल्यांना चालना देण्यासाठी ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या कौशल्याला व्यापक ओळख मिळण्यास मदत होणार आहे.
स्पर्धेतील विविध कौशल्य प्रकार, पात्रता, नियमावली तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देऊन वेळेत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहिती किंवा मार्गदर्शनासाठी इच्छुकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा ०२१६२-२३९९३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सहायक आयुक्त श्रीमती अ. मु. पवार यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment