उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम

वाईतील मतिमंद विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप; संस्थेच्या कार्यकर्त्यांचा शहर शिवसेनेकडून गौरव

वाई प्रतिनिधी :

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेनेच्या वतीने वाई येथे सामाजिक बांधिलकी जपणारा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. शहरातील रेव्हीका साहिल अक्षय इन्स्टिट्यूट या मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेत शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, शैक्षणिक साहित्य आणि विविध प्रकारचा खाऊ वितरित करण्यात आला. विशेष मुलांसोबत संवाद साधत त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. या प्रसंगी संस्थेचे संचालक, शिक्षक आणि कर्मचारी यांचा त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात शहर शिवसेना प्रमुख राजाभाऊ गुजर, युवासेना शहर प्रमुख आकाश साळुंखे, राजेश साळवी, रामदास जाधव, सुशांत आबा पारठे, शाहवाज खरखंडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी टापरे, कार्यशाळा प्रमुख विजय कर्णे, कला शिक्षक आनंदराव माने तसेच गौरव खाडे यांनी शहर शिवसेनेने मतिमंद विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील विशेष मुलांप्रती संवेदनशीलता जपणारे असे उपक्रम अधिकाधिक राबविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक कार्यातूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना खरी अभिवादन करता येते, असे सांगत गरजू आणि विशेष मुलांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहन केले.

शहर शिवसेनेच्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिक, पालक आणि शिक्षकांनी स्वागत करत कौतुक व्यक्त केले. विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारे असे उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl