दारूच्या नशेचा थरार! नदीत वाहणाऱ्या व्यक्तीला पोलिस व ग्रामस्थांनी दिले जीवनदान

दारूच्या नशेचा थरार! नदीत वाहणाऱ्या व्यक्तीला पोलिस व ग्रामस्थांनी दिले जीवनदान

सातारा प्रतिनिधी :

सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असताना सातारा तालुक्यातील मर्ढे–आणेवाडी गावांना जोडणाऱ्या पुलाजवळ रविवारी एक थरारक घटना घडली. दारूच्या नशेत पाय घसरून कृष्णा नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाऊ लागलेल्या व्यक्तीचा सातारा तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जीवावर उदार होत केलेल्या धाडसी बचावामुळे मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बचाव करण्यात यश मिळाले.

मौजे मर्ढे येथील रहिवासी शिवाजी शिंगटे हे स्मशानभूमीच्या पलीकडील परिसरात असताना दारूच्या नशेत त्यांचा तोल जाऊन ते थेट नदीच्या पाण्यात पडले. मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला मोठा प्रवाह असल्याने ते वेगाने वाहून जाऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच पुलावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस हवालदार आशिष कुमठेकर, पोलीस शिपाई प्रसाद शिंदे, होमगार्ड करण मोरे आणि किरण खवळे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

या धाडसी मोहिमेत मर्ढे गावच्या सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, पोलीस पाटील महेश रोकडे तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही मोलाची साथ दिली. सर्वांच्या समन्वयातून आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर शिवाजी शिंगटे यांना सुरक्षितपणे नदीबाहेर काढण्यात यश आले. वेळेत मदत मिळाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले. संकटाच्या प्रसंगी दाखविलेल्या धाडस, तत्परता आणि समन्वयामुळे एका व्यक्तीचा जीव वाचू शकला, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी-नाले आणि पुलांवरील परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत वाहन अथवा पायी प्रवास करू नये, तसेच स्वतःच्या जीवाशी खेळ करू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी नागरिकांना केले आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl