साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! अंधारीचे सुपुत्र सागर शेलार यांची जागतिक मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! अंधारीचे सुपुत्र सागर शेलार यांची जागतिक मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

✍️ संतोष मालुसरे,

तापोळा | प्रतिनिधी

सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी म्हणजे अंधारी गावचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि आशियाई सुवर्णपदक विजेते सागर शेलार यांची भारतीय मिक्स बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या जागतिक आंतरराष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून सागर शेलार भारतीय खेळाडूंचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या दीर्घकालीन मेहनतीला, आंतरराष्ट्रीय अनुभवाला आणि प्रशिक्षक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याला मिळालेली ही मोठी दाद मानली जात आहे.

सागर शेलार यांनी खेळाडू म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यानंतर प्रशिक्षक म्हणूनही अनेक खेळाडूंना घडवत त्यांनी मिक्स बॉक्सिंग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे.

भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षा आदितीताई तटकरे (आमदार), महासंघाचे सचिव राकेश म्हसकर तसेच महाराष्ट्र राज्य मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, संघाच्या प्रशिक्षकपदी सागर शेलार यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल सातारा जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, विविध सामाजिक संस्था, खेळाडू, प्रशिक्षक आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जागतिक स्पर्धेत भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे.

विशेष

आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण यश मिळवत आता भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणारे सागर शेलार हे सातारा जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl