दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाची गुणवत्तेची परंपरा कायम; शिष्यवृत्ती परीक्षेत सार्थक गोळेची घवघवीत कामगिरी



दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाची गुणवत्तेची परंपरा कायम; शिष्यवृत्ती परीक्षेत सार्थक गोळेची घवघवीत कामगिरी

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश; गुणवंत विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

पांचगणी, प्रतिनिधी :


कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेव संचलित दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय, दापवडी (ता. जावळी, जि. सातारा) या विद्यालयाने आपल्या गुणवत्तेच्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी कु. सार्थक अमोल गोळे याने उल्लेखनीय यश संपादन करत शिष्यवृत्ती प्राप्त केली. त्याच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा राज्यस्तरावर छाप पडली असून, विद्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित करून त्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे यांनी विद्यालयाच्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, "विद्यालयाचा सातत्याने उंचावत जाणारा गुणवत्तेचा आलेख हा संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा, दर्जेदार वातावरण आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध आहे. शिक्षकांचे समर्पित प्रयत्न आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळेच असे यश मिळत असून, भविष्यातही विद्यालयाने गुणवत्तेची ही परंपरा कायम राखावी."

विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. बी. आखाडे यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता दडलेली असते. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि शिक्षकांचे अथक परिश्रम यामुळेच आज सार्थकने हे यश मिळवले आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि विद्यालय भविष्यातही अनेक गुणवंत विद्यार्थी घडवत राहील."

या यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदाशिव रांजणे, पोपट आप्पा रांजणे, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक नितीन घाडगे यांनी केले.

सार्थक गोळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस संस्था, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.


दापवडी : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या सार्थक अमोल गोळे याचा सत्कार करताना दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे. समवेत सदाशिव रांजणे, पोपट आप्पा रांजणे, मुख्याध्यापक डी. बी. आखाडे, शिक्षक व मान्यवर.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl