डॉक्टरांसाठी 'झिरो कोड कोचिंग' ठरतेय नवी संधी; डिजिटल शिक्षण व्यवसायाची दिशा

डॉक्टरांसाठी 'झिरो कोड कोचिंग' ठरतेय नवी संधी; डिजिटल शिक्षण व्यवसायाची दिशा

डॉ. भाग्यश्री मोहन यांच्या चार दिवसीय निवासी शिबिरात वैद्यकीय व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी घेतले प्रशिक्षण

सातारा, प्रतिनिधी :
डॉक्टर, प्रशिक्षक, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना त्यांचे ज्ञान डिजिटल माध्यमातून देशभर तसेच जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी 'झिरो कोड कोचिंग' ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत प्रसिद्ध कोच डॉ. भाग्यश्री मोहन यांनी व्यक्त केले. साताऱ्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले चार दिवसीय निवासी झिरो कोड कोचिंग शिबिर उत्साहात पार पडले.

या शिबिरात राज्यातील विविध भागांतून आलेल्या डॉक्टर, प्रशिक्षक, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, या बॅचमध्ये मोठ्या संख्येने वैद्यकीय व्यावसायिक सहभागी झाले होते. आपल्या ज्ञानाचा प्रभावी डिजिटल कोर्स तयार करून तो अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण सहभागीांना देण्यात आले.

शिबिरादरम्यान प्रत्येक सहभागीला 'रेडी टू लॉन्च' ऑनलाइन कोर्स तयार करण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करण्यात आले. कोणतेही तांत्रिक कोडिंग न करता आधुनिक डिजिटल साधनांच्या मदतीने ऑनलाइन कोचिंग व्यवसाय उभारण्याची संपूर्ण प्रक्रिया शिकविण्यात आली. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागीांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

डॉ. भाग्यश्री मोहन यांनी सांगितले की, आजच्या डिजिटल युगात डॉक्टर, शिक्षक किंवा कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपल्या अनुभवाचे आणि ज्ञानाचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करून व्यापक स्तरावर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. यामुळे केवळ ज्ञानाचा प्रसार होत नाही, तर स्वतःचा शाश्वत डिजिटल व्यवसायही उभा राहू शकतो.

 प्रशिक्षणात काय शिकविण्यात आले?

चार दिवसीय निवासी प्रशिक्षणात सहभागींचे ज्ञान, कौशल्य किंवा अनुभव ऑनलाइन कोचिंग प्रोग्राममध्ये कसे रूपांतरित करायचे, याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये –

  • ऑनलाइन कोर्स डिझाइन व अभ्यासक्रमाची रचना
  • दर्जेदार कंटेंट आणि स्टडी मटेरियल तयार करणे
  • आकर्षक पॉवरपॉइंट (PPT) सादरीकरण तयार करणे
  • वैयक्तिक ब्रँडिंग
  • डिजिटल मार्केटिंग आणि लीड जनरेशन
  • प्रभावी सेल्स स्ट्रॅटेजी
  • झूमद्वारे ऑनलाइन प्रशिक्षण सत्रांचे नियोजन
  • व्हॉट्सॲप कम्युनिटी व्यवस्थापन
  • संपूर्ण ऑनलाइन कोचिंग बिझनेस सिस्टम उभारणी

या सर्व विषयांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे सहभागीांना स्वतःचा ऑनलाइन कोचिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl