संघटन सृजन अभियानातून महाबळेश्वर काँग्रेसला नवे बळ; राजेंद्र भंडारी यांच्या फेरनिवडीबद्दल जयदीप शिंदे यांच्याकडून सत्कार
संघटन सृजन अभियानातून महाबळेश्वर काँग्रेसला नवे बळ; राजेंद्र भंडारी यांच्या फेरनिवडीबद्दल जयदीप शिंदे यांच्याकडून सत्कार
महाबळेश्वर, प्रतिनिधी :
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात राबविण्यात आलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत महाराष्ट्रातही संघटन मजबूत करण्यासाठी विविध स्तरांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती व फेरनियुक्तीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या अभियानाअंतर्गत महाबळेश्वर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. राजेंद्र भंडारी यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
या फेरनिवडीबद्दल वाई विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे युवा नेते श्री. जयदीप शिंदे यांच्या वतीने श्री. राजेंद्र भंडारी यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी काळात महाबळेश्वर तालुक्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, संघटन सृजन अभियानामुळे पक्षाची तळागाळातील संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम होणार असून कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळेल. महाबळेश्वर तालुक्यात काँग्रेस पक्ष अधिक प्रभावीपणे जनतेच्या प्रश्नांवर काम करेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
श्री. राजेंद्र भंडारी यांनी फेरनिवडीबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे तसेच सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत तालुक्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सत्कार समारंभास महाबळेश्वर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. भंडारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
Comments
Post a Comment