अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला श्री. जैन युवक महासंघ; जांभळीत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप, मंत्री मकरंद आबा पाटील यांची उपस्थिती


अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला श्री. जैन युवक महासंघ; जांभळीत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप, मंत्री मकरंद आबा पाटील यांची उपस्थिती

वाई, प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी श्री. जैन युवक महासंघ, पुणे यांच्या वतीने जांभळी (ता. वाई) येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि सामाजिक संस्थांच्या या मदतकार्याचे कौतुक केले.

अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, अशा कठीण परिस्थितीत अन्नधान्य व दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंचे किट वाटप करून पूरग्रस्तांना मोठा दिलासा देण्यात आला. या मदत उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना तातडीचा आधार मिळाला.

यावेळी मंत्री मकरंद आबा पाटील यांनी आपत्तीच्या काळात समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून मदतीचा हात पुढे करणाऱ्या श्री. जैन युवक महासंघ, पुणे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. शासनाच्या मदतीबरोबरच विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि दानशूर व्यक्ती पुढे आल्यास आपत्तीग्रस्तांना अधिक प्रभावी मदत करता येते, असे त्यांनी सांगितले.

संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या श्री. जैन युवक महासंघाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही स्वागत करण्यात आले. अशा सेवाभावी कार्यामुळे आपत्तीग्रस्त कुटुंबांना मानसिक व आर्थिक आधार मिळत असून, समाजात परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl