महाबळेश्वर–कुंभरोशी मार्गावरील जीवघेणा खड्डा; अपघातांची मालिका सुरू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन'एमएसआयडीसीने तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन' – स्थानिकांचा इशारा

महाबळेश्वर–कुंभरोशी मार्गावरील जीवघेणा खड्डा; अपघातांची मालिका सुरू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

'एमएसआयडीसीने तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन' – स्थानिकांचा इशारा

प्रतापगड प्रतिनिधी :

महाबळेश्वर–कुंभरोशी या महत्त्वाच्या मार्गावर कुंभरोशी गावाच्या हद्दीत मरीआई मंदिराजवळ पडलेला मोठा खड्डा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत असून, या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या धोकादायक खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

या मार्गावर दररोज शेकडो पर्यटक, स्थानिक नागरिक तसेच मालवाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. मात्र मरीआई मंदिराजवळील मोठा खड्डा वाहनचालकांच्या नजरेत न आल्याने वारंवार अपघात होत आहेत. अलीकडेच या खड्ड्यात एका दुचाकीचे मागील चाक पूर्णपणे निकामी झाले, तर एका चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी टळली असली तरी भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या जावली फरशी व कुंभरोशी परिसरातील नागरिकांनी खड्ड्याजवळ एकत्र येत प्रशासन आणि संबंधित यंत्रणेच्या निष्क्रियतेचा निषेध केला. यावेळी "खड्डा बुजवा – जीव वाचवा", "निष्क्रिय प्रशासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

ग्रामस्थांनी सांगितले की, या धोकादायक खड्ड्याबाबत अनेक वेळा एमएसआयडीसी आणि संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर अशा प्रकारची परिस्थिती असणे अत्यंत गंभीर असून, अपघात रोखण्यासाठी तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

यावेळी एकनाथ उतेकर, किरण मोरे, संजय उतेकर, सचिन उतेकर, आनंद येरूनकर यांच्यासह जावली फरशी व कुंभरोशी येथील अनेक नागरिक उपस्थित होते.

ग्रामस्थांनी एमएसआयडीसी आणि संबंधित प्रशासनाला इशारा देत, "तात्काळ खड्ड्याची दुरुस्ती करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणे थांबवावे; अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल," असा स्पष्ट इशारा दिला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl