के.ई.एम. रुग्णालयाच्या नवनियुक्त अधिष्ठात्यांचा शिवसेनेकडून सत्कार; रुग्णांच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्याची ग्वाही

के.ई.एम. रुग्णालयाच्या नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांचा शिवसेनेतर्फे सत्कार; रुग्णांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा

✍️संतोष मालुसरे,
मुंबई, विशेष प्रतिनिधी 

शिवसेना शिवडी विधानसभा आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने बृहन्मुंबई महापालिकेचे गोरगरिबांचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के.ई.एम. रुग्णालय, परळ येथील नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. हरीश पाठक यांना नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा देत रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, उपचार प्रक्रियेतील समस्या, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा तसेच अधिक प्रभावी आणि संवेदनशील आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणींबाबतही माहिती देण्यात आली.

डॉ. हरीश पाठक यांनी रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देत अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याचेही त्यांनी कौतुक केले.

या प्रसंगी शिवसेना महिला विभाग प्रमुख रेश्मा सकपाळ-गावकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष जितेंद्र दगडूदादा सकपाळ, शिवडी विधानसभा प्रमुख कुणाल प्रभुणे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विधानसभा प्रमुख गायत्री आंब्रे, महिला विधानसभा प्रमुख आकांक्षा गावडे, समिधा भालेकर, उपविभाग प्रमुख प्रफुल अहिरे, शाखाप्रमुख (२०३) मुकेश महाडिक, शाखाप्रमुख (२०५) संजय गोसावी, महिला शाखाप्रमुख (२०२) ऋतुजा खामकर, (२०३) मनीषा रानवडे, (२०४) स्नेहा शिर्के, (२०५) दर्शना पवार, (२०६) राणी जेनापल्ली यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीमुळे रुग्णालय प्रशासन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्यात समन्वय अधिक दृढ होऊन सर्वसामान्य रुग्णांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl