डचेस रोड परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरण; हडपसरच्या मिळकतधारकाविरोधात गुन्हा दाखल

डचेस रोड परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरण; हडपसरच्या मिळकतधारकाविरोधात गुन्हा दाखल

महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर तालुक्यातील नाकिंदा येथील डचेस रोड परिसरात कथित बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी एका मिळकतधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाबळेश्वर परिसरातील अनधिकृत वृक्षतोडीच्या घटनांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, ग्राम महसूल अधिकारी सागर दिलीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, दि. १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मौजे नाकिंदा येथील सर्व्हे क्रमांक २२/ब/११ मधील डचेस रोड परिसरात, हॉटेल गौरी शेजारील रस्त्यालगतच्या जागेवर विनापरवाना वृक्षतोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी राहुल उत्तम बालवडकर यांच्याविरोधात महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम १९६४ मधील कलम ३(१) व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वृक्षतोड केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.

दि. २ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार देण्यासाठी फिर्यादी पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या प्रकरणी घटनास्थळाला भेट देण्याची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांनी पार पाडली असून पुढील तपास पोलीस हवालदार मढेकर हे करीत आहेत. तसेच हर्षद गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

महाबळेश्वरसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या परिसरात बेकायदेशीर वृक्षतोडीच्या घटना चिंतेचा विषय बनत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक असताना अनधिकृत वृक्षतोडीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl