२०० फूट खोल दरीत पडलेल्या युवकाला मिळाले नवजीवन; प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांच्या धाडसी मोहिमेला यश

२०० फूट खोल दरीत पडलेल्या युवकाला मिळाले नवजीवन; प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांच्या धाडसी मोहिमेला यश

प्रतापगड | प्रतिनिधी

महाबळेश्वर-प्रतापगड मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेत २०० फूट खोल दरीत कोसळलेल्या युवकाला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि महाबळेश्वर पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही मोठी दुर्घटना टळली असून युवकाला अक्षरशः नवजीवन मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये कामासाठी येत असलेला एक युवक आंबेनळी घाटातील मेटतळे धबधब्याजवळील परिसरात लघुशंकेसाठी थांबला होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो अंदाजे २०० फूट खोल दरीत कोसळला. मद्यप्राशन केल्यामुळे तो दरीत पडल्यावर त्याच ठिकाणी झोपून राहिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संबंधित युवक दरीत पडल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिसराची पाहणी करून महाबळेश्वर पोलिस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर बचाव मोहिमेसाठी आवश्यक रोप रेस्क्यू सेटअप उभारण्यात आला. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास बचावकार्य सुरू झाले. खोल दरी, अंधार, सतत सुरू असलेला पाऊस आणि घसरडा परिसर यामुळे ही मोहीम अत्यंत धोकादायक ठरत होती.

रोपच्या साहाय्याने बचाव पथकातील सदस्य दरीत उतरले आणि जखमी युवकाचा शोध सुरू केला. काही वेळातच युवक जखमी अवस्थेत आढळून आला. त्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्यही घटनास्थळी दाखल झाले. पावसामुळे दरीतील उतार अत्यंत घसरडे झाले होते. त्यामुळे जखमी युवकाला स्ट्रेचरमध्ये सुरक्षित ठेवून वर आणणे हे मोठे आव्हान होते. मात्र सर्व सदस्यांनी समन्वय राखत अथक परिश्रम घेतले आणि तब्बल अडीच तास चाललेल्या मोहिमेनंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास युवकाला सुरक्षितपणे मुख्य रस्त्यावर आणण्यात यश मिळविले.

घटनेदरम्यान महाबळेश्वर पोलिस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. बचावकार्य सुरू असताना परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. युवकाला दरीतून बाहेर काढताच तातडीने महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने तो शुद्धीत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

आंबेनळी घाट हा खोल दऱ्या, तीव्र वळणे आणि घनदाट जंगलासाठी ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात येथे अपघातांचा धोका अधिक वाढतो. अशा परिस्थितीत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांनी दाखविलेली तत्परता, धाडस आणि समन्वय यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले. या यशस्वी मोहिमेनंतर सर्व स्तरांतून बचाव पथकांचे कौतुक होत आहे.

या मोहिमेत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामणे, संकेत सावंत, मुन्ना उतेकर, अवि उतेकर, आदेश मोरे, निखिल सावंत, अभि सपकाळ, रुपचंद मंडल, गणेश वागदरे आणि विक्रांत जाधव यांनी सहभाग घेतला. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सचे सोमनाथ वागदरे, सुजित कोळी, दिपक ओंबळे आणि श्रीकांत नाविलकर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महाबळेश्वर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेत आवश्यक सहकार्य केले.

याबाबत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे यांनी सांगितले की, "सर्व टीम्सच्या सहकार्यामुळे आणि सदस्यांच्या तत्परतेमुळे २०० फूट खोल दरीत पडलेल्या व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात यश आले. 

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl