शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण, छत्री व खाऊ वाटप; बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण, छत्री व खाऊ वाटप; बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

महाबळेश्वर | प्रतिनिधी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच १९ जून रोजी साजऱ्या करण्यात आलेल्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिनाच्या निमित्ताने शहर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना पावसाळी छत्र्यांचे वाटप तसेच खाऊ वाटप करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले, तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या छत्र्यांचे वितरण करून त्यांना मदतीचा हात देण्यात आला. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने वर्धापन दिनाला वेगळे स्वरूप दिले.

या कार्यक्रमास सातारा जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, उपशहरप्रमुख राजेश साळवी, बाळकृष्ण ढेबे, तालुका संघटिका सुजाताई मोरे, महिला शहर संघटिका शिल्पा आडिया, संघटिका वसुधा बगडे, माजी सातारा जिल्हा संघटिका लीलाताई शिंदे, वाहतूक सेना पदाधिकारी राजू बोधले, विभागप्रमुख शंकर ढेबे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख चंद्रकांत पांचाळ, अंकुश ईगावे, अमोल साळुंखे, शाहनवाज भाई खरखंडे, अलीभाई वारुणकर, असिफभाई महापुळे, अर्बन बँकेचे माजी चेअरमन मनोज ताथवडेकर, बाळकृष्ण (तात्या) साळुंखे, दत्ताभाऊ बावळेकर, नाट्य शिव प्रतिष्ठानचे किसन खामकर, रमेश शिंदे, समीर तांबोळी, रवींद्र बर्गे, सागर चिकणे, यश मोरे, पत्रकार राजेश सोंडकर यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर ठेवत समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली कळकळ यांचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमांचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl