मधपाळांसाठी डिजिटल व्यासपीठाची निर्मिती; मध संचालनालय महाबळेश्वर व खादी ग्रामोद्योग मंडळाची सोशल मीडियावर दमदार उपस्थिती
मधपाळांसाठी डिजिटल व्यासपीठाची निर्मिती; मध संचालनालय महाबळेश्वर व खादी ग्रामोद्योग मंडळाची सोशल मीडियावर दमदार उपस्थिती
महाबळेश्वर | प्रतिनिधी
राज्यातील सर्व मधपाळ, मध उत्पादक, मधमाशीपालन व्यवसायाशी संबंधित शेतकरी तसेच नागरिकांपर्यंत मधमाशीपालन क्षेत्रातील विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, तांत्रिक माहिती, संशोधन, शासकीय उपक्रम आणि घडामोडी प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई आणि मध संचालनालय, महाबळेश्वर यांनी सोशल मीडियावर विविध अधिकृत खाती सुरू केली आहेत. या माध्यमातून मधमाशीपालन क्षेत्राशी निगडित माहितीचा प्रचार-प्रसार अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
डिजिटल युगात माहितीचे महत्त्व लक्षात घेऊन मध संचालनालय, महाबळेश्वर तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांनी इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया माध्यमांचा वापर सुरू केला आहे. या अधिकृत खात्यांद्वारे मधपाळांना शासकीय योजना, अनुदान, प्रशिक्षण शिबिरे, मधमाशी व्यवस्थापन, मध उत्पादनातील नवीन तंत्रज्ञान, बाजारपेठेतील संधी तसेच यशस्वी मधपाळांच्या अनुभवांची माहिती नियमितपणे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील मधपाळांपर्यंत माहिती वेगाने आणि थेट पोहोचविण्यासाठी व्हॉट्सॲप चॅनेलची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील मध उत्पादक आणि मधपाळांना एकाच व्यासपीठावर जोडण्यास मदत होणार असून परस्पर संवाद, माहितीची देवाणघेवाण आणि शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळू शकणार आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्या वतीने राज्यातील सर्व मधपाळ, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी या सोशल मीडिया खात्यांना फॉलो, लाईक आणि शेअर करून या उपक्रमाला सहकार्य करावे, तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्या अधिकृत सोशल मीडिया लिंक :
इंस्टाग्राम :
https://www.instagram.com/dirbees_mahabaleshwar?igsh=cjV3czNzNXo4ZjE4
फेसबुक पेज (मधुबन) :
https://www.facebook.com/madhubanhoney
व्हॉट्सॲप चॅनेल :
https://whatsapp.com/channel/0029VbCsGCvGzzKOay3Okg44
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या अधिकृत सोशल मीडिया लिंक :
इंस्टाग्राम :
https://www.instagram.com/mskvib?igsh=MWRjZDc3NG1kMDBlMw==
फेसबुक लिंक :
https://www.facebook.com/share/18kpMQZ7fH/
फेसबुक पेज :
https://www.facebook.com/profile.php?id=61578853973871
या उपक्रमामुळे मधमाशीपालन क्षेत्रातील माहितीचे केंद्रीकरण होऊन राज्यातील मधपाळांना एक सक्षम डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मध उद्योगाच्या विकासाला चालना देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात असून, राज्यातील प्रत्येक मधपाळाने या डिजिटल मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment