महाबळेश्वरमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन; नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम


महाबळेश्वरमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन; नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

प्रतापगड | प्रतिनिधी :

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनिल लक्ष्मण शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात सामाजिक बांधिलकी जपत मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष श्री. सुनिल दादा शिंदे मित्र परिवार, ममता ज्येष्ठ नागरिक संघ मुंबई आणि भारती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाबळेश्वर येथील पेटीत लायब्ररी हॉल येथे हे शिबिर पार पडणार असून, परिसरातील गरजू नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

“दमदार पाऊल तुमचे, प्रगतीची उजळी वाट, अखंड लाभो आपणांस पाठबळाचे हात,” अशा शुभेच्छा संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वाढदिवस साजरा करण्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रम राबवून लोकसेवेची परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, लांब व जवळचे कमी दिसणे, सतत डोके दुखणे, डोळ्यांमध्ये मास वाढणे, डोळे लाल होणे अशा विविध नेत्रविकारांची तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मोफत नंबरचे चष्मे जागेवरच देण्यात येणार असून, गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शस्त्रक्रिया भारती हॉस्पिटल येथे करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

महाबळेश्वर शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे शिबिर मोठा दिलासा ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl