वाढदिवसाचे समाजसेवेत रूपांतर; अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चंदन दादा चव्हाण यांचा प्रेरणादायी ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

वाढदिवसाचे समाजसेवेत रूपांतर; अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चंदन दादा चव्हाण यांचा प्रेरणादायी ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

महाबळेश्वर प्रतिनिधी :

आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात अनेकजण वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करतात; मात्र समाजातील दुःखी, गरजू आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करत वाढदिवसाला समाजसेवेची जोड देणारे उपक्रम क्वचितच पाहायला मिळतात. महाबळेश्वर तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक श्री. चंदन दादा सुनीता राजाराम चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अशाच एका प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन केले असून संपूर्ण तालुक्यात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

“एक हात मदतीचा” या सामाजिक भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच शैक्षणिक निधीचे वाटप करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आई-वडिलांचे छत्र हरपले आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक व मानसिक आधार मिळावा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, ही भावना दृढ व्हावी या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

महाबळेश्वर तालुक्यात गोरगरिबांचे कैवारी, अनाथांचे नाथ आणि सुख-दुःखातील सोबती अशी ओळख निर्माण केलेल्या श्री. चंदन दादा चव्हाण यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमधून समाजाशी असलेली बांधिलकी जपली आहे. यावेळीही वाढदिवसाचा खर्च औपचारिक कार्यक्रमांवर न करता गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा घेतलेला निर्णय समाजासाठी आदर्श ठरत आहे. शिक्षण हेच भविष्य घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके तसेच आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

हा सामाजिक उपक्रम मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती, महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाची सुरुवात  श्रीमती सुनीता राजाराम चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. राजेंद्र शेठ राजपुरे, पंचायत समिती सभापती सौ. शकुंतलाताई चोरमले, जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. श्री. प्रवीणजी भिलारे, जिल्हा परिषद सदस्य श्री. अजित सपकाळ, पंचायत समिती उपसभापती श्री. संजयजी मोरे, जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय केळगणे, पंचायत समिती सदस्या सौ. वंदनाताई भिलारे, माजी सभापती श्री. संजूबाबा गायकवाड, पंचायत समिती सदस्य श्री. संजयजी शेलार, तहसीलदार श्री. सचिन मस्के, गटविकास अधिकारी श्री. विजयजी विभुते, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. रमेशजी गंवरे, पोलीस निरीक्षक श्री. बापूसाहेब सांडभोर, उद्योजक श्री. सचिन पप्पू शेठ उतेकर तसेच उद्योजक श्री. अशोक दादा सपकाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे, महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांमधील समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून अनाथ विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. समाजातील वंचित आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उचललेले हे पाऊल केवळ मदतीपुरते मर्यादित नसून समाजात माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणारे ठरत आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून “एक हात मदतीचा” हा उपक्रम महाबळेश्वर तालुक्यात सामाजिक ऐक्य आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl