समाजसेवेच्या कार्याला राज्यस्तरीय गौरव; इनरव्हील क्लब अध्यक्षा वर्षा पार्टे यांना ‘समाज उत्कर्ष पुरस्कार’

समाजसेवेच्या कार्याला राज्यस्तरीय गौरव; इनरव्हील क्लब अध्यक्षा वर्षा पार्टे यांना ‘समाज उत्कर्ष पुरस्कार’

महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर येथील इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय समाज उत्कर्ष पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. वाई येथील उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्था यांच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष स्व. पी. डी. शेठ पार्टे तसेच माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका विमलताई पार्टे यांच्या स्नुषा असलेल्या वर्षा पार्टे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. विशेषतः इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गरजू नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेकडून त्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

वाई येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा येथे हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमात कला, कृषी, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश प्रभाकर पाटील, वाई अर्बन बँकेचे सीए राजेंद्र अमृत गाडगीळ, ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर रघुनाथ जोशी, निवृत्त शास्त्रज्ञ धर्मा मारुती काळे, श्याम चावलानी, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मनिषा शिरीष घैसास तसेच उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या सचिव तृप्ती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक घागरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विपिन नारायण वैराट यांनी केले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना वर्षा संतोष पार्टे यांनी हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या सर्व सदस्य, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या सामूहिक कार्याचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली. समाजसेवेच्या कार्याला मिळालेल्या या सन्मानामुळे अधिक जोमाने आणि समर्पणाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

महाबळेश्वर परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी कार्यात सक्रिय सहभाग घेत असलेल्या वर्षा पार्टे यांच्या या गौरवामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl