“देशहितासाठी युरोप दौऱ्याला दिला नकार; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला शंभूराज देसाई यांचा सकारात्मक प्रतिसाद”
“देशहितासाठी युरोप दौऱ्याला दिला नकार; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला शंभूराज देसाई यांचा सकारात्मक प्रतिसाद”
मुंबई प्रतिनिधी , दि. १२ मे :
देशातील सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले असताना, त्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याणमंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला लंडन-पॅरिस-ॲम्स्टरडॅम युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाची राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून “देश प्रथम” या भूमिकेचा हा आदर्श नमुना मानला जात आहे.
माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी देसाई कुटुंबीयांनी उन्हाळी सुट्टीदरम्यान युरोप सहलीचे नियोजन केले होते. या दौऱ्यात ब्रिटनची राजधानी लंडन, फ्रान्सची राजधानी पॅरिस तसेच नेदरलँड्समधील प्रसिद्ध ॲम्स्टरडॅम शहराचा समावेश होता. पर्यटन व कौटुंबिक विश्रांतीच्या उद्देशाने हा दौरा आखण्यात आला होता. मात्र देशाच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत आणि विदेशी चलन बचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या हेतूने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सध्याच्या जागतिक घडामोडी, वाढती आर्थिक आव्हाने आणि देशहिताच्या दृष्टीने जबाबदारीची जाणीव ठेवून घेतलेल्या या निर्णयामुळे शंभूराज देसाई यांच्या भूमिकेचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. वैयक्तिक आनंद, सुट्टी आणि पर्यटनापेक्षा राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे असल्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून दिला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, लोकप्रतिनिधींनी स्वतः उदाहरण घालून दिल्यास समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो. पंतप्रधानांच्या आवाहनाला केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीतून प्रतिसाद देत शंभूराज देसाई यांनी साधेपणा, जबाबदारी आणि राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, “देशहित सर्वोच्च” ही भूमिका स्वीकारत घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे बोलले जात असून, देसाई यांच्या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.
Comments
Post a Comment