कांदाटी-शिंदी भागाचे कणखर उगवते नेतृत्व; भूषण मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव

कांदाटी-शिंदी भागाचे कणखर उगवते नेतृत्व; भूषण मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव

प्रतापगड | प्रतिनिधी

कांदाटी-शिंदी भागातील युवा नेतृत्व म्हणून वेगाने उदयास येत असलेले शिंदी गावचे सुपुत्र श्री भूषण मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या भूषण मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला असून, त्यांच्या कार्याची दखल आता संपूर्ण कांदाटी परिसरात घेतली जात आहे.

कोयना धरणग्रस्त संघर्ष समितीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करताना भूषण मोरे यांनी भागातील नागरिकांचे प्रश्न जवळून समजून घेतले. विशेषतः शिंदी-मोरनी परिसरातील वनखात्याच्या अडथळ्यामुळे रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्नासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. स्थानिक स्तरापासून ते दिल्लीपर्यंत पाठपुरावा करत त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या दृढ निश्चयामुळे आज कांदाटीकरांचे डांबरीकरणासह चांगल्या रस्त्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

याचबरोबर शिंदी भागातील सहा गावांसाठी वलवण येथे दवाखान्याची मंजुरी मिळवून देण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अनेक प्रशासकीय अडचणींना सामोरे जात अखेर हा प्रस्ताव मंजूर करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे आरोग्य सुविधेपासून वंचित असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून, भूषण मोरे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

नोकरी सांभाळत समाजहितासाठी सातत्याने काम करणारे युवा कार्यकर्ते म्हणून भूषण मोरे यांच्याकडे पाहिले जात आहे. भागातील उर्वरित जटिल समस्या सोडवण्यासाठीही ते भविष्यात सक्रिय राहतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. कांदाटी-शिंदी भागातील प्राथमिक शाळांमधील पटसंख्येचा प्रश्न, वाघावळे येथील मल्लिकार्जुन विद्यालयाच्या अडचणी, मल्लिकार्जुन मंदिर, चकदेव मंदिर तसेच परिसरातील पौराणिक मंदिरे आणि किल्ल्यांचा विकास यांसारख्या विषयांवर एकत्रितपणे काम करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.

ज्येष्ठ मार्गदर्शकांनी युवकांना एकत्र येऊन आपल्या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे आवाहन केले. “एकी आणि संयम ठेवल्यास विकासकामांना गती मिळते, तर फाटाफुटीमुळे कामे बिघडतात,” असे मत व्यक्त करत कांदाटी भागासाठी सध्या दोन मंत्री कार्यरत असल्याने या संधीचा सकारात्मक उपयोग करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. पंचायत समिती कांदाटीमध्ये असल्याने भूषण मोरे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाने युवकांना सोबत घेऊन उर्वरित समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

श्री जोम मल्लिकार्जुन, कुंभळजाई माता तसेच ग्रामदैवतांचे आशीर्वाद भूषण मोरे यांच्या पाठीशी कायम राहोत आणि त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळो, अशा भावना व्यक्त करत विविध स्तरांतून त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl