पाचगणीतील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; १५ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पाचगणीतील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; १५ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पाचगणी प्रतिनिधी — 

पर्यटननगरी पाचगणीतील मुख्य बाजारपेठ व शॉपिंग सेंटर परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, यामुळे शहराच्या स्वच्छतेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसत आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत नगरसेवक प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत १५ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास जाहीर निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

दरवर्षी लाखो पर्यटक पाचगणीला भेट देत असतात. पर्यटन कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल वसूल केला जात असतानाही मूलभूत सुविधा मात्र अपुऱ्या असल्याची खंत स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. विशेषतः मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिला पर्यटकांना शौचालयांच्या गैरसोयीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील ई-टॉयलेट्स गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असून, त्यांची दुरुस्ती होण्याचे दिलेले आश्वासनही पूर्ण झालेले नाही.

या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शहरात विविध विकासकामे सुरू असली तरी आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप कारंजकर यांनी केला आहे. शॉपिंग सेंटरमधील शौचालयांची दयनीय अवस्था ही पर्यटनस्थळ म्हणून पाचगणीसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब ठरत असून, यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

येत्या दोन महिन्यांत पर्यटन हंगामाचा जोर वाढणार असल्याने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शौचालयांची दुरुस्ती व नूतनीकरण सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “वारंवार लेखी निवेदने देऊनही आणि प्रत्यक्ष पाहणी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. जर १५ दिवसांच्या आत काम सुरू झाले नाही, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल,” असा इशारा कारंजकर यांनी दिला आहे.

या इशाऱ्यानंतर तरी प्रशासन हालचाल करणार की परिस्थिती कायम राहणार, याकडे नागरिकांसह व्यापारी आणि पर्यटकांचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl