हिलरेंजच्या डॉ. तेजस्विनी भिलारे यांना ‘सक्सेस दुर्गा पुरस्कार’; श्रेयस तळपदे यांच्या हस्ते गौरव


हिलरेंजच्या डॉ. तेजस्विनी भिलारे यांना ‘सक्सेस दुर्गा पुरस्कार’; श्रेयस तळपदे यांच्या हस्ते गौरव

पाचगणी प्रतिनिधी — 

सक्सेस अबँकस अँड एज्युकेशन, सातारा या शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘सक्सेस दुर्गा पुरस्कार’ यंदा हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे यांना प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते हा पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला.

साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी सक्सेस अबँकसचे किरण पाटील, नितीन पाटील, सौ. स्मिता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. भिलारे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा विशेष गौरव करण्यात आला.

पुस्तकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या भिलार येथील स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या सुनबाई असलेल्या डॉ. तेजस्विनी भिलारे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हिलरेंज एज्युकेशन सोसायटीमार्फत विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न विशेष ठरत आहेत.

ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ते सक्षमपणे उभे राहावेत, या उद्देशाने त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची ‘सक्सेस दुर्गा पुरस्कार’साठी निवड करण्यात आली.

पुरस्कार स्विकारताना डॉ. भिलारे यांनी सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठीच नव्हे तर हिलरेंज परिवारासाठी प्रेरणादायी आहे. या माध्यमातून आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळेल.” त्यांच्या या यशाबद्दल हिलरेंज परिवारासह सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl