हिंगणगावात शिवसेनेची दमदार एन्ट्री; फलटण तालुक्यातील पहिल्या शिवसेना शाखेचे जल्लोषात उद्घाटन
हिंगणगावात शिवसेनेची दमदार एन्ट्री; फलटण तालुक्यातील पहिल्या शिवसेना शाखेचे जल्लोषात उद्घाटन
राजे गटाच्या माध्यमातून संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शाखा उद्घाटन; शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
फलटण प्रतिनिधी :
फलटण तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठी चर्चा निर्माण करणारा कार्यक्रम हिंगणगाव येथे उत्साहात पार पडला. हिंगणगाव येथे फलटण तालुक्यातील पहिल्या शिवसेना (शिंदे गट) शाखेचे उद्घाटन आणि शिवसेना फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. राजे गटाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे हिंगणगाव परिसरात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कार्यक्रमाला माजी आमदार दिपकराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता बापू अनपट, नूतन पंचायत समिती सदस्य डॉ. संतोष कारंडे, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा समन्वयक विराज खराडे, उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे, फलटण तालुका शिवसेनाप्रमुख ज्ञानेश्वर पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावागावात शाखा विस्ताराचे काम अधिक गतीने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील युवकांना संघटनेत संधी देऊन विकासाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत वक्त्यांनी मांडले.
हिंगणगाव शिवसेना शाखेचे प्रमुख ओंकार भोईटे, उपप्रमुख मंगेश काकडे, सरचिटणीस हेमंत निंबाळकर यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा सांभाळली होती. तसेच कैलासवासी मालोजीराव जानोजीराव भोईटे इनामदार बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन पराग भोईटे इनामदार, जयदिप खंडेराव भोईटे, हिंगणगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दिपक परशुराम भोईटे, माजी सरपंच संतोष भोईटे इनामदार, माजी सरपंच योगेश भोईटे, विश्वास रामचंद्र भोईटे, कैलास विनायक भोईटे, माजी उपसरपंच प्रवीण दशरथ भोईटे, राहुल विलास शेडगे, विनोद वसंत भोईटे, जयदीप ढमाळ, मारुती खुडे, शिवाजी रंगराव भोईटे, कृष्णात प्रकाश भोईटे, संदीप शामराव भोईटे, दत्तात्रय पंढरीनाथ भोईटे, वाल्मिक राम शिंदे, कांताराम लक्ष्मण शिंदे, सुनील चंदर शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
याशिवाय जयदीप महादेव भोईटे, गणेश प्रभाकर भोईटे, निखिल ज्ञानदेव भोईटे, चेतन कोकरे, संतोष धनसिंग भोईटे, प्रदीप शामराव भोईटे, धीरज भरत भोईटे, अलंकार सचिन भोईटे, तन्मय दत्तात्रय भोईटे, बापू लाला शिंदे, हरिभाऊ बजरंग शिंदे, विशाल गजानन भोईटे, नरसिंग ठोंबरे, अक्षय महादेव पांडुळे, रोहित राजेंद्र ठोंबरे, प्रवीण विजय सावंत, आनंदा दशरथ बागडे, संतोष ज्ञानदेव ठोंबरे, गणेश गजानन भोईटे, निकेश रवींद्र भोईटे, सचिन पांडुरंग भंडलकर, सुरज रामदास भोईटे, किरण रवींद्र बोबडे, श्रीजीत रविंद्र ढमाळ, सुशांत राजेंद्र भोईटे, हार्दिक शिवाजी भोईटे, शुभम दत्तात्रय पांडुळे, सागर लालासो भोईटे आणि सुरज महिंद्र काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंगणगावसह आळजापूर, सासवड, तांबवे आणि आद्रकी गावांतील ग्रामस्थ व शिवसैनिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर भगवामय वातावरणाने दुमदुमून गेला होता. घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
फलटण तालुक्यातील पहिल्या शिवसेना शाखेच्या उद्घाटनामुळे आगामी स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद वाढण्याची चिन्हे दिसत असून, या कार्यक्रमाने तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Comments
Post a Comment