वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांची सहकाराला भक्कम साथ; महाबळेश्वर अर्बन बँकेला शेअर्सद्वारे आर्थिक बळ
वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांची सहकाराला भक्कम साथ; महाबळेश्वर अर्बन बँकेला शेअर्सद्वारे आर्थिक बळ
महाबळेश्वर प्रतिनिधी :
वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस न ठरता समाजहिताचे कार्य करण्याची संधी असते, याचा आदर्श महाबळेश्वर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. सुनिल शेठ शिंदे यांनी घालून दिला आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी महाबळेश्वरची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या दि. महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस एक लाख रुपयांचे शेअर्स देऊन सहकार क्षेत्राला भक्कम पाठबळ दिले.
यावेळी नगरसेवक व बांधकाम सभापती मा. अफजलभाई सुतार यांनी ५० हजार रुपये, नगरसेवक व शिक्षण सभापती मा. रोहितभाऊ ढेबे यांनी ५० हजार रुपये तसेच नगरसेवक मा. संतोष आबा शिंदे यांनीही ५० हजार रुपयांचे शेअर्स बँकेच्या नावे सुपूर्द केले. सर्व मान्यवरांनी बँकेच्या प्रगतीसाठी दिलेल्या या योगदानाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
दि. महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री. सी. डी. बावळेकर यांच्याकडे हे शेअर्स अधिकृतरित्या सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री. बंडू दादा कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष श्री. युसुफभाई शेख, संचालक श्री. समीर सुतार, सतीश ओंबळे, प्रशांत कात्रट तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी महाबळेश्वर अर्बन बँक ही शहराच्या आर्थिक व्यवहारातील एक महत्त्वाची संस्था असून स्थानिक नागरिक, व्यापारी व सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजांना आधार देण्याचे काम बँक सातत्याने करत असल्याचे सांगितले. सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेले हे योगदान प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संचालक श्री. समीर सुतार यांनी केले. चेअरमन श्री. सी. डी. बावळेकर यांनी स्वागत व मनोगत व्यक्त करताना बँकेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक श्री. बंडू दादा कुंभारदरे यांनी केले.
महाबळेश्वरच्या सामाजिक, आर्थिक आणि सहकार क्षेत्रात लोकप्रतिनिधींनी वाढदिवसानिमित्त दिलेला हा सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
Comments
Post a Comment