आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य प्रतापगड प्रतिनिधी : पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंड परिसरात गुरुवारी (दि. १२) पहाटे भीषण अपघात घडला. मुंबईहून आपल्या गावी परत येत असताना वॅग्नर कार सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना सकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलादपूर पोलिसांच्या मदतीने अत्यंत धाडसी पद्धतीने बचावकार्य राबवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील लाखवड गावचे काही ग्रामस्थ मुंबईहून आपल्या गावी येत होते. पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंड दरम्यान वाहनाचा ताबा सुटल्याने वॅग्नर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खोल दरीत कोसळली. घाटातील हा भाग अत्यंत धोकादायक असल्याने अपघातानंतर वाहन थेट सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत जाऊन अडकले. पहाटेच्या शांत वातावरणात झालेल्या या अपघातामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्...
माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू महाबळेश्वर, प्रतिनिधी : महाबळेश्वर–मेढा मुख्य रस्त्यावर माचूतर गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून महाबळेश्वर शहरासह टेकवली गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरील माचूतर गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महाबळेश्वरहून साताऱ्याकडे निघालेली राजमाता जिजाऊ एसटी बस (क्र. एमएच १४ एनई ४२२५) आणि महाबळेश्वरच्या दिशेने येणारी दुचाकी (क्र. एमएच ११ एव्ही २०८८) यांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात नरेश रमेश भोंडेकर (वय ४५, रा. टेकवली, ता. महाबळेश्वर) यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी भ...
महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन ✍️मिलिंद काळे महाबळेश्वर प्रतिनिधी: महाबळेश्वर–पाचगणी येथे नागरिकांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर सुरूर–पोलादपूर राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली कामे आणि रस्त्याची अत्यंत खराब झालेली अवस्था याबाबत आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. सार्वजनिक बांधकाम मंत्री Shivendraraje Bhosale आणि मदत व पुनर्वसन मंत्री Makarand Patil यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत रस्त्याच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सुरूर–पोलादपूर हा मार्ग राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या पर्यटन मार्गांपैकी एक असून या मार्गावरून दररोज हजारो पर्यटक तसेच स्थानिक नागरिक प्रवास करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. या समस्यांमुळे महाबळेश्वर–पाचगणी परिसरातील नागरिकांमध्ये त...
Comments
Post a Comment