ग्रामीण आरोग्यसेवेत योगदान देणाऱ्या परिचारिकांचा तापोळ्यात सन्मान; आंतरराष्ट्रीय नर्सेस डे उत्साहात साजरा
ग्रामीण आरोग्यसेवेत योगदान देणाऱ्या परिचारिकांचा तापोळ्यात सन्मान; आंतरराष्ट्रीय नर्सेस डे उत्साहात साजरा
✍️संतोष मालुसरे,
तापोळा | प्रतिनिधी
आधुनिक परिचारिकेच्या कार्याला जागतिक स्तरावर नवी दिशा देणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि शिवसेना युवा नेते Shrikant Shinde यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे व कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या सूचनेनुसार शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिवस्वराज्य सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भागात अहोरात्र सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शाल, श्रीफळ आणि मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम ठेवण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. दुर्गम भागात अनेक अडचणींना सामोरे जात रुग्णसेवा देणाऱ्या परिचारिकांचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास शिवसेना प्रणित शिवस्वराज्य सेनेचे अध्यक्ष व वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष जितेंद्र दगडूदादा सकपाळ, ग्रामपंचायत वानवली-सोळशी-तापोळा लोकनियुक्त सरपंच रमेश धनावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर खामकर, डॉ. स्मिता देशमुख, शिवस्वराज्य सेनेचे भिवंडी शहराध्यक्ष विनोद सकपाळ, वैद्यकीय मदत कक्षाचे आनंद धनावडे, शिवतत्त्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोहम पाटकर, अमृता कदम, आरोग्य सहाय्यक सोनाली निकम, शुभम थोरात, अर्धपरिचारिका मनिषा धनावडे, श्रीकृष्ण पाटील तसेच विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांना प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या सेवाभावाला सलाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment