बालशिक्षणासाठी इनरव्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम; अंगणवाडीस स्मार्ट टीव्ही व बसखरे भेट

बालशिक्षणासाठी इनरव्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम; अंगणवाडीस स्मार्ट टीव्ही व बसखरे भेट

महाबळेश्वर | प्रतिनिधी

समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वर यांच्या वतीने सातारा येथील अंगणवाडीस आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. क्लबच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात अंगणवाडीसाठी ३२ इंचांचा स्मार्ट टीव्ही तसेच लहान मुलांना बसण्यासाठी बसखरे भेट देण्यात आले.

महाबळेश्वर येथील हॉटेल अशोका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास नागरी प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या सातारा येथील अंगणवाडीला हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. बालशिक्षण अधिक प्रभावी आणि आधुनिक पद्धतीने व्हावे, तसेच लहान मुलांना शिक्षणाची गोडी लागावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी इनरव्हील क्लब ही जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थांपैकी एक असून महिला सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिली असल्याचे सांगितले. “या संस्थेचे पदाधिकारी म्हणून कार्य करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. क्लबच्या माध्यमातून आम्ही विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रम सातत्याने राबवत असतो. सातारा येथील अंगणवाडीची गरज लक्षात घेऊन बालशिक्षणासाठी आवश्यक असलेला स्मार्ट टीव्ही आणि मुलांना बसण्यासाठी बसखरे देण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे त्यांनी नमूद केले.

अंगणवाडी सेविका रेश्मा विष्णू तपासे यांनी अंगणवाडीस मिळालेल्या मदतीबद्दल इनरव्हील क्लब व अध्यक्षा वर्षा पार्टे यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे लहान मुलांच्या शिक्षणाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सचिव सपना अरोरा, रमा पल्लोड, ॲड. राधा मुक्कावर, मुक्ता कोमटी, अश्विनी कोमटी, वर्षा कोमटी, नेहा साळवी, तृप्ती तोष्णीवाल यांच्यासह क्लबच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl