माजी विद्यार्थिनीच्या दातृत्वातून दापवडी हायस्कूलला भव्य व्यासपीठ; विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सोनाली रांजणे यांचे प्रेरणादायी योगदान

माजी विद्यार्थिनीच्या दातृत्वातून दापवडी हायस्कूलला भव्य व्यासपीठ; विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सोनाली रांजणे यांचे प्रेरणादायी योगदान

पांचगणी, ता. ८ : जावली तालुक्यातील दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे योगदान किती महत्त्वाचे असते, याचा प्रेरणादायी प्रत्यय नुकताच आलेल्या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. शाळेच्या माजी विद्यार्थिनी तथा उन्नती व उत्कर्ष परिवाराच्या संचालिका सौ. सोनाली हनुमंत रांजणे यांनी स्वखर्चातून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करून विद्यालयासाठी भव्य व्यासपीठ उभारून दिले. या व्यासपीठाचे लोकार्पण विविध मान्यवरांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किसन जाधव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उन्नती व उत्कर्ष परिवाराच्या संचालिका सौ. सोनाली रांजणे तसेच संस्थापक-अध्यक्ष हनुमंत बळवंत रांजणे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव डी. के. जाधव, संचालक धोंडीराम जंगम, बी. व्ही. शेलार, तानाजी बाबर, व्ही. आर. उफाळे, आर. आर. जंगम, अजित आपटे, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, दापवडीचे सरपंच महादेव रांजणे, माजी सरपंच संतोष रांजणे, मुख्याध्यापक डी. बी. आखाडे, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यालयाच्या प्रगतीसाठी केलेल्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल सौ. सोनाली रांजणे व हनुमंत रांजणे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना सौ. सोनाली रांजणे म्हणाल्या, “ज्या शाळेने आपल्याला घडवले, संस्कार दिले आणि आयुष्याला दिशा दिली, त्या शाळेप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून हा छोटासा प्रयत्न केला आहे. शाळेच्या प्रगतीत आपलाही खारीचा वाटा असावा हीच मनापासून इच्छा आहे.”

यावेळी हनुमंत रांजणे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “या व्यासपीठावरून भविष्यात राज्य व देशपातळीवरील वक्ते, उत्कृष्ट खेळाडू आणि गुणवंत विद्यार्थी घडावेत ही आमची अपेक्षा आहे. शाळेच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर राहू.”

संस्थेचे सचिव डी. के. जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दापवडी हायस्कूलला दात्यांची परंपरा लाभली असली तरी माजी विद्यार्थिनी म्हणून सौ. सोनाली रांजणे यांनी दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याची नोंद संस्थेच्या इतिहासात कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास एम. जी. जाधव, पी. जे. कांबळे, डी. जी. नेवसे, वाय. बी. फरांदे, आर. एस. मापारी, एस. एच. जुनघरे, उपसरपंच सौ. नंदा रांजणे, सदाशिव रांजणे, विलास रांजणे पाटील, तानाजी रांजणे, सुशिल गोळे, भरत रांजणे, सचिन रांजणे, संतोष शिराळे, सौ. मंदाताई रांजणे, नथुभाऊ रांजणे, पोलीस पाटील सुनिता रांजणे, बबन शिंदे, सरपंच सौ. संगीता शिराळे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघाचे सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन नितीन घाडगे यांनी केले, तर मुख्याध्यापक डी. व्ही. आखाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


दापवडी : विद्यालयासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाच्या लोकार्पण प्रसंगी सौ. सोनाली रांजणे व हनुमंत रांजणे यांचा सत्कार करताना अध्यक्ष किसन जाधव, शेजारी डी. के. जाधव व इतर मान्यवर.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl