बुरडाणीतील भीषण अपघातात घावरीतील पिता-पुत्र गंभीर जखमी; उपचारासाठी मदतीचे आवाहन

बुरडाणीतील भीषण अपघातात घावरीतील पिता-पुत्र गंभीर जखमी; उपचारासाठी मदतीचे आवाहन

महाबळेश्वर प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यातील घावरी गावावर दुर्दैवाचा डोंगर कोसळला असून बुरडाणी येथे झालेल्या भीषण अपघातात घावरी येथील शेतकरी कुटुंबातील पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात श्री. राजेंद्र लक्ष्मण सकपाळ (वय ४०) आणि त्यांचा मुलगा कु. रोशन राजेंद्र सकपाळ (वय २०) हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर सातारा येथील गिरिजा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


अपघाताची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. जिल्हा परिषद सदस्य अजित सकपाळ यांनीही तातडीने पुढाकार घेत जखमींना त्वरित सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे दोघांनाही वेळेत उपचार मिळू शकले.

दरम्यान, सकपाळ कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे शेतकरी कुटुंब असल्याने उपचाराचा खर्च पेलणे त्यांच्यासाठी कठीण बनले आहे. डॉक्टरांकडून पुढील उपचारासाठी मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत असून कुटुंबीयांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी आणि मानवतेच्या भावनेतून नागरिकांनी शक्य ती आर्थिक मदत करावी, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी आर्थिक मदतीसाठी सौ. सुनंदा राजेंद्र सकपाळ यांच्या Google Pay क्रमांक 7045074347 तसेच UPI ID sakpalroshan414@oksbi वर मदत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“आपली छोटीशी मदतही या कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली असून हा मदतीचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl