छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे महाबळेश्वरात आयोजन; नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा — तहसील प्रशासनाचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे महाबळेश्वरात आयोजन; नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा — तहसील प्रशासनाचे आवाहन

महाबळेश्वर प्रतिनिधी , दि. ७ मे २०२६ —

 महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत महाबळेश्वर शहरात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. ८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सेठ गंगाधर माखरिया हायस्कूल, महाबळेश्वर येथे पार पडणार आहे.


महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे, शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शासनाने महसूल सेवा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले असून, त्याची अंमलबजावणी या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या शिबिरात नागरिकांना विविध महसूल विषयक सेवा, प्रमाणपत्रे, शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया तसेच समस्या निवारणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन मस्के तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.

महाबळेश्वर शहरातील शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे शिबिर महत्त्वाचे ठरणार असून, शासनाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl