गोरोशी ग्रामदैवत आई श्री जन्नी कुंभाळज मातेच्या मूर्तीचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा ३ मे रोजी

गोरोशी ग्रामदैवत आई श्री जन्नी कुंभाळज मातेच्या मूर्तीचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा ३ मे रोजी

प्रतापगड प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यातील गोरोशी गावाचे ग्रामदैवत असलेल्या आई श्री जन्नी कुंभाळज मातेच्या मूर्तीचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवार दिनांक ३ मे २०२६ रोजी मोठ्या धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त गावात धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वैशाख पौर्णिमा, शके १९४५ या पवित्र दिवशी शुभ मुहूर्तावर हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार असून या धार्मिक विधीसाठी प. पू. १०८ श्री ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज (प्रभुजी), बोंडाई मठ संस्थान यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि पूजाअर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


या भव्य सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार मकरंद पाटील, अजित चोरमले, संजय शेलार, सचिन उत्तेकर, सुभाष समाजभूयया आणि सुनील पार्टे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सोहळ्याची सुरुवात शनिवार, दिनांक २ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. त्यानंतर रविवार, दिनांक ३ मे रोजी सकाळी १० वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडणार असून दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोमवार, दिनांक ४ मे रोजी सकाळी ११ वाजता सांगता कार्यक्रम होणार आहे.

या सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक डबलबारी स्वरूपातील “भजनाचा जंगी सामना” होय. रविवार, ३ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत हा रंगतदार भजन सामना पार पडणार आहे. यामध्ये श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ आणि श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ (ठाणे) यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली मैफल रंगणार आहे. भजन सम्राटांच्या शिष्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या पारंपरिक कार्यक्रमाकडे भक्तांचे विशेष लक्ष लागले आहे.

या भव्य सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ मंडळ गोरोशी, ग्रामस्थ मंडळ गोरोशी (मुंबई), श्री जन्नी कुंभाळज माता महिला मंडळ गोरोशी तसेच श्री जन्नी कुंभाळज माता क्रिकेट संघ गोरोशी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

गोरोशी गावात होणाऱ्या या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यास परिसरातील भाविक, ग्रामस्थ आणि भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl