“महाबळेश्वरातील सोनाट गावात धाडसी घरफोडी; दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी १.५ तोळे सोने व रोख रक्कम लंपास”

“महाबळेश्वरातील सोनाट गावात धाडसी घरफोडी; दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी १.५ तोळे सोने व रोख रक्कम लंपास”

संतोष मालुसरे,

तापोळा प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात दुपारच्या सुमारास धाडसी घरफोडीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वर्गीय राघू जानू कदम यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे १.५ तोळे सोन्याचे दागिने व सुमारे २५ ते ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ही चोरी करून चोरटे दुचाकीवरून पळून गेले. दोघेही संशयित व्यक्ती मानेपर्यंत मास्क लावून होते. त्यापैकी एकाने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता, तर दुसऱ्याने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांतच ही माहिती गावात व परिसरात वेगाने पसरली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, हीच जागा यापूर्वी गव्याच्या हल्ल्यामुळे चर्चेत आली होती. त्याच घरात आता चोरीची घटना घडल्याने स्थानिकांमध्ये अधिकच चिंता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, कुठेही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, संबंधित चोरटे आढळल्यास त्यांना पकडून जवळच्या पोलीस ठाण्यात दाखल करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच संशयितांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl