नेस्को ग्राउंड ड्रग्स प्रकरणात फरार आरोपी पोलादपूरमध्ये अटक; एक्सटसी पुरवठ्याचा धक्कादायक उलगडा

नेस्को ग्राउंड ड्रग्स प्रकरणात फरार आरोपी पोलादपूरमध्ये अटक; एक्सटसी पुरवठ्याचा धक्कादायक उलगडा

मुंबई प्रतिनिधी : 

गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर पार पडलेल्या म्युझिक कन्सर्टदरम्यान ड्रग्सच्या अती सेवनामुळे दोन युवकांचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत फरार आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली होती.

या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच एनडीपीएस (NDPS) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी आयुष विकी साहित्य (वय २४, रा. उल्हासनगर) हा घटनेनंतर फरार झाला होता. तो मुंबई-गोवा महामार्ग मार्गे गोव्याकडे पळून जात असल्याची गोपनीय माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलादपूर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ हालचाल करत पोलादपूर परिसरात नाकाबंदी व सापळा रचला. काही वेळातच संशयित वाहनाची ओळख पटवून आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

तपासात उघड झाले की, आयुष साहित्य याने सदर म्युझिक कन्सर्टमध्ये “एक्सटसी” या नावाचे अमली पदार्थ वितरित केले होते. या अमली पदार्थाच्या सेवनामुळेच दोन युवकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे.

अटक केलेल्या आरोपीस पुढील कारवाईसाठी वनराई पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई मा. पोलिस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

दरम्यान, या घटनेमुळे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl