लहान शाखेची मोठी झेप; पाचगणी शाखा तिसऱ्या क्रमांकावर, ठेवी-नफ्यात उल्लेखनीय कामगिरी

लहान शाखेची मोठी झेप; पाचगणी शाखा तिसऱ्या क्रमांकावर, ठेवी-नफ्यात उल्लेखनीय कामगिरी

पाचगणी – प्रतिनिधी

गुरुवर्य दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लिमिटेड यांच्या पाचगणी शाखेने चालू आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२६ अखेर उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवत बँकेच्या एकूण शाखांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. मर्यादित लोकसंख्या आणि तुलनेने लहान विस्तार असूनही शाखेने साधलेली ही प्रगती विशेष लक्षवेधी ठरली आहे.

चालू आर्थिक वर्षात शाखेच्या एकूण ठेवी २४ कोटी २५ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या असून विविध प्रकारच्या कर्जवाटपातून ४५ कोटी ३७ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. यासोबतच शाखेने १ कोटी ९६ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावत आर्थिक बळकटी सिद्ध केली आहे. या कामगिरीमुळे शाखेच्या कार्यक्षमतेचा आणि व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या यशामध्ये बँकेचे संचालक प्रतिनिधी अजित काशिनाथ कळंबे यांचे विशेष योगदान मानले जात आहे. सहकार क्षेत्रात नव्याने पदार्पण करूनही त्यांनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करत अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे. वयाने सर्वांत लहान संचालक असूनही त्यांनी दाखवलेली कामगिरी प्रेरणादायी ठरत असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात होत आहे.

या यशानिमित्त पाचगणीतील विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शाखेत एकत्र येत आनंद व्यक्त केला. शंकरराव श्रीपती कळंबे, सुभाष मारुती कासुर्डे तसेच ह.भ.प. कळंबे महाराज पतसंस्था काटवली चे पदाधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

लहान शाखा असूनही सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत पाचगणी शाखेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून भविष्यातही अशीच प्रगती कायम राहील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl