साप्ताहिक संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ साखरे; पत्रकारितेच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार

साप्ताहिक संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ साखरे; पत्रकारितेच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार

सातारा प्रतिनिधी : 

ऑल इंडिया डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना संलग्न साप्ताहिक संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी ‘साप्ताहिक कृष्ण कुंज’चे कार्यकारी संपादक सोमनाथ साखरे यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.


यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष संजय कदम यांनी प्रिंट मिडियाचे महत्त्व अधोरेखित केले. दैनिक आणि साप्ताहिक माध्यमे शासनाच्या विविध योजना आणि माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असतात, मात्र अलीकडील काळात साप्ताहिकांवर विविध निर्बंध लादले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर साप्ताहिकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघटना भक्कमपणे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऑल इंडिया डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील एक प्रभावी आणि मोठी संघटना मानली जाते. ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य सुरू असून राज्यभरात २०० हून अधिक संपादक सदस्य कार्यरत आहेत. साप्ताहिक माध्यमांना संघटित करण्यासोबतच त्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम संघटनेमार्फत सातत्याने केले जात आहे.

दरम्यान, येत्या ४ मे रोजी पणजी, गोवा येथे संघटनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गोवा राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय कदम यांनी दिली. या अधिवेशनादरम्यान साप्ताहिक पत्रकारितेसमोरील अडचणींबाबत ठराव सादर करून शासनाकडे निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सोमनाथ साखरे यांच्या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील साप्ताहिक पत्रकारांना एक सक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त होत असून पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक संघटित आणि प्रभावी लढा उभा राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवडीवेळी जिल्ह्यातील विविध साप्ताहिकांचे संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl