स्वरसम्राज्ञीचा अंत: अशा भोसले यांचे निधन; संगीतविश्व शोकसागरात

 स्वरसम्राज्ञीचा अंत: अशा भोसले यांचे निधन; संगीतविश्व शोकसागरात

मुंबई प्रतिनिधी 

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाला आपल्या आवाजाने अमर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका  अशा भोसले  यांचे आज निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत असून संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्या प्रकृती अस्वस्थतेमुळे त्रस्त होत्या. त्यांना छातीचा संसर्ग व तीव्र थकवा जाणवत होता. काल अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर प्रकृती अधिकच खालावली. पुढे अवयव निकामी होण्याच्या स्थितीत त्यांचे निधन झाले.

दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांकडून “सर्व काही ठीक होईल” असा आशावाद व्यक्त करण्यात आला होता. मात्र आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये आणि कलाकारांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. देशभरातील अनेक दिग्गज कलाकार, राजकीय नेते आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

 अशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गात हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये अमूल्य ठेवा निर्माण केला. त्यांच्या आवाजातील वैशिष्ट्यपूर्ण शैली, भावपूर्ण सादरीकरण आणि विविधतेने त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतसृष्टीतील एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुंबईत शासकीय इतमामात होण्याची शक्यता असून याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेली गाणी यांमधून त्या कायम जिवंत राहतील, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl