“क्षेत्र महाबळेश्वर येथील १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; कारण अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू

“क्षेत्र महाबळेश्वर येथील १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; कारण अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू”

महाबळेश्वर प्रतिनिधी : 

महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खुशी दशरथ पवार (वय १७ वर्षे ५ महिने) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास क्षेत्र महाबळेश्वर येथील स्वतःच्या राहत्या घरात ही घटना घडल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची नोंद खुशीचे चुलते रमेश दत्तात्रय पवार (वय ४३) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात आहे.

दरम्यान, रमेश पवार यांच्या खबरीवरून पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (अ.म. रजिस्टर क्रमांक ०९/२०२६) केली आहे. पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून पोलीस हवालदार मर्ढेकर हे पुढील तपास करत आहेत. घटनास्थळी पंचनामा करून अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अल्पवयीन मुलांमधील मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl