डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीची महाबळेश्वर तालुक्यात नवी कार्यकारिणी जाहीर; विविध पदांवर नव्या नियुक्त्या
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीची महाबळेश्वर तालुक्यात नवी कार्यकारिणी जाहीर; विविध पदांवर नव्या नियुक्त्या
महाबळेश्वर प्रतिनिधी :
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने आज महाबळेश्वर तालुक्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष ऋषी दादा अरुण वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात संघटनात्मक बांधणीला चालना देत विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी शहर महिला अध्यक्षा सायराताई शेख, सरचिटणीस नुराजांहा खारखडे, पदाधिकारी मोहन कारंडे, आदित्य चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी शहर महिला कार्याध्यक्ष म्हणून फिरोजा मुस्तकीन महापुळे, शहर संघटक म्हणून मोहम्मद वारुणकर तर शहर सरचिटणीस म्हणून राकेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष ऋषी दादा अरुण वायदंडे म्हणाले की, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष शुकुमार कांबळे सर तसेच राज्याध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभर आणि राज्यभर संघटन मजबूत करण्याचे काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या आचार-विचारांचा वारसा पुढे नेत हा पक्ष शोषित, पीडित, वंचित आणि कामगार वर्गाच्या न्यायहक्कांसाठी सदैव रस्त्यावर उतरून संघर्ष करीत असल्याची ओळख निर्माण केली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षाची संघटना वाढवावी, सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी पुढे येऊन ठामपणे काम करावे आणि अन्यायाविरोधात आवाज बुलंद करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही संघटन मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Comments
Post a Comment