आई-वडिलांच्या स्मृतींना कृतज्ञ अभिवादन; कारंडे कुटुंबियांचा पुण्यस्मरण सोहळा रविवारी

आई-वडिलांच्या स्मृतींना कृतज्ञ अभिवादन; कारंडे कुटुंबियांचा पुण्यस्मरण सोहळा रविवारी

कुंभरोशी प्रतिनिधी : 

आई-वडील हेच आपल्या जीवनातील खरे मंदिर असून त्यांच्या संस्कारांमुळेच जीवनाची दिशा ठरते, या भावनेतून कारंडे कुटुंबियांच्या वतीने दिवंगत स्व. राघू विठू करंडे आणि स्व. सोनाबाई राघू करंडे यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम रविवारी, दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

कारंडे कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पुण्यस्मरण सोहळ्याद्वारे दिवंगत आई-वडिलांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात येणार असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास आदरांजली वाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कुटुंबीयांच्या मते, आई-वडील हेच आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात. “ना मंदिर, ना मशीद, ना चर्च, ना गुरुद्वारा… माझ्यासाठी खरे मंदिर तेच, जिथे माझ्या आई-वडिलांची मूर्ती आहे,” या भावनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

स्व. राघू विठू कारंडे आणि स्व. सोनाबाई राघू कारंडे यांनी आपल्या आयुष्यात कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजातील माणुसकी जपण्याचा आदर्श घालून दिला होता. त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी कुटुंबियांच्या वतीने पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देत समाजातही संस्कार आणि कुटुंबमूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो.

या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी करंडे कुटुंबातील श्री. सदाशिव राघू कारंडे, श्री. तानाजी राघू कारंडे, श्री. बजरंग राघू कारंडे यांच्यासह समस्त कारंडे परिवाराने सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून दिवंगतांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली अर्पण करावी, अशी विनंती कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl