तेटलीत कोंडाई चॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कार सोहळा जल्लोषात; शंकरराव साळुंखे (अण्णा) व शकुंतला ताई सकपाळ यांचा सन्मान

तेटलीत कोंडाई चॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कार सोहळा जल्लोषात; शंकरराव साळुंखे (अण्णा) व शकुंतला ताई सकपाळ यांचा सन्मान

तापोळा प्रतिनिधी : 

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील तेटली गावात कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुरस्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांचे दरवर्षी वितरण केले जाते. यंदाच्या समारंभात जावली पंचायत समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला ताई सकपाळ यांना ‘कोंडाई सामाजिक महिला पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले, तर जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती व डीएमके जावली सहकारी बँकेचे संचालक मा. श्री. शंकरराव साळुंखे (अण्णा) यांना ‘कोंडाई सामाजिक पुरुष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच रोख पारितोषिक असे होते. पुरस्कार प्रदान करताना उपस्थित मान्यवरांनी दोन्ही मान्यवरांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. समाजहितासाठी केलेले त्यांचे योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला कोयना विभागातील ४३ गाव समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. आनंद कदम (मुरडे), ३२ गाव समाज सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष ह. भ. प. कोंडीराम महाराज कदम तसेच २२ गाव समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. हरिबा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय कोयना विभागातील कीर्तनकार ह. भ. प. बाळकृष्ण महाराज शिंदे, शांताराम सरपंच (आपटी), डीएमके जावली सहकारी बँकेचे संचालक गणेश भोसले, केळघर (सोळशी) येथील सरपंच एकनाथ पाटील, सावरी मंडळाचे अध्यक्ष अंकुश शिंदे, हरिभाऊ साळुंखे, श्री. विलास फाळके तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक कोरेगावचे शाखा अधिकारी श्री. भीमराव केंजळे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रस्टच्या वतीने गरजू व्यक्तींना कीट वाटप करण्यात आले. तसेच “चला सयांनो संस्कृती जपू” या टॅगलाईनखाली जिजामाता महिला मंडळ तेटली आणि कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण वातावरण उत्साही आणि प्रसन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रताप भोसले आणि सचिव प्रशांत भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ. उज्वला भोसले-जाधव यांनी केले, तर ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रकाश भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टचे संस्थापक किसन भोसले, मार्गदर्शक आर. डी. भोसले, उपाध्यक्ष प्रकाश भोसले, कार्याध्यक्ष प्रताप भोसले, प्रकाश सुतार, प्रशांत भोसले, वसंत भोसले, भरत भोसले, श्रीमती नंदा भोसले, डॉ. उज्वला भोसले-जाधव, सौ. कविता सकपाळ, सौ. विजया इंगवले तसेच ग्रामस्थ मंडळ तेटली, जिजामाता महिला मंडळ तेटली, माऊली मंडळ मुंबई आणि श्री बाळसिद्धेश्वर प्रतिष्ठान तेटली यांच्या सहकार्याने विशेष मेहनत घेण्यात आली. कार्यक्रमामुळे तेटली गावात सामाजिक एकोप्याचे आणि संस्कृती जपण्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl