महिला दिनानिमित्त “देणे समाजाचे” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; संवाद कार्यशाळेतून आरोग्य, करिअर व स्त्री-स्वातंत्र्य विषयांवर मार्गदर्शन

महिला दिनानिमित्त “देणे समाजाचे” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; संवाद कार्यशाळेतून आरोग्य, करिअर व स्त्री-स्वातंत्र्य विषयांवर मार्गदर्शन


महाबळेश्वर प्रतिनिधी : 

जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील महिलांचे सशक्तीकरण, संवाद आणि सामाजिक बांधिलकी यांना चालना देण्याच्या उद्देशाने माई वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक सोसायटी, इनरव्हील क्लब महाबळेश्वर आणि रोटरी क्लब महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने “देणे समाजाचे” या विशेष कार्यक्रमासह संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हॉटेल पूनमच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील विविध संस्था, संघटना, महिला मंडळे तसेच तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. श्याम बडवे, माई वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. अजित नरेंद्र प्रभाळे, इनरव्हील क्लब महाबळेश्वरच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे, रोटरी क्लब महाबळेश्वरचे अध्यक्ष विजय काळे, पीडीसी रोहिणी वैद्य तसेच दुर्वेश प्रभाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. श्याम बडवे यांनी संवाद कार्यशाळेद्वारे दोन पिढ्यांमधील संवादाचे महत्त्व, बदलत्या सामाजिक परिस्थितीत महिलांचे स्थान, शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक, करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल तसेच स्त्री-स्वातंत्र्य आणि आधुनिक विचारसरणी या विविध विषयांवर सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माई वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. अजित नरेंद्र प्रभाळे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती देत समाजासाठी काहीतरी देण्याची भावना प्रत्येकामध्ये जागृत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी प्रमुख वक्ते डॉ. श्याम बडवे यांचा सत्कार इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय काळे, पीडीसी रोहिणी वैद्य आणि दुर्वेश प्रभाळे यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन व आयोजन रोटरी क्लब अध्यक्ष विजय काळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी इनरव्हील क्लब महाबळेश्वरच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास इनरव्हील क्लब, रोटरी क्लब तसेच माई वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक सोसायटीचे सर्व सदस्य, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, महिला मंडळांच्या सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl