महाबळेश्वर एसटी डेपोतील बसांची दयनीय अवस्था; फुटलेल्या काचा व निघालेल्या फ्लोअरिंगमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

महाबळेश्वर एसटी डेपोतील बसांची दयनीय अवस्था; फुटलेल्या काचा व निघालेल्या फ्लोअरिंगमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

महाबळेश्वर प्रतिनिधी :

 जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील एसटी डेपोमधून धावणाऱ्या बसांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. डेपोमधील अनेक बसांच्या साईटच्या संरक्षण काचा फुटलेल्या अवस्थेत असून काही बसांच्या आतल्या फ्लोअरिंगचा पत्रा देखील निघालेला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भिलार येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक भिलारे यांनी या बसांची स्थिती निदर्शनास आणून दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या साईटच्या संरक्षण काचा अनेक बसांमध्ये फुटलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे प्रवासादरम्यान धूळ, वारा तसेच अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर काही बसांच्या आतल्या फ्लोअरिंगचा पत्रा निघाल्याने प्रवाशांना उभे राहणे किंवा चालणेही धोकादायक ठरत आहे.

महाबळेश्वर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने येथे दररोज हजारो पर्यटक येत असतात. अशा परिस्थितीत एसटीच्या बसांची ही जीर्ण अवस्था राज्य परिवहन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. ग्रामीण भागातील नागरिक तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणावर एसटी सेवेवर अवलंबून असल्यामुळे बसांची योग्य देखभाल आणि दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या बसांची दुरुस्ती करून प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अन्यथा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन महाबळेश्वर एसटी डेपोतील बसांची स्थिती सुधारावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl