जागतिक महिला दिनानिमित्त महाबळेश्वर नगरपरिषदेत महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव; खेळ-मनोरंजनातून उत्साहपूर्ण साजरा
जागतिक महिला दिनानिमित्त महाबळेश्वर नगरपरिषदेत महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव; खेळ-मनोरंजनातून उत्साहपूर्ण साजरा
महाबळेश्वर प्रतिनिधी —
जागतिक महिला दिनानिमित्त महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने शहरातील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने परिश्रम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच विविध खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिरभाई मुलाणी, मुख्याधिकारी योगेश पाटील, आरोग्य सभापती अँड. संजय जंगम, माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका विमल पार्टे मॅडम, महिला व बालविकास सभापती संगिता दत्तात्रय वाडकर, नगरसेविका विद्या बाविलेकर, रेश्मा ढेबे, शबाना मानकर, पल्लवी कोंडाळकर, प्रियंका वायदंडे, स्मिता पाटील, विमल बिरामणे, निना झोडे तसेच नगरसेवक संतोष आखाडे, राहुल पिसाळ, रोहित ढेबे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सापशिडी, संगीत खुर्ची, ‘बिन इट टू विन’ यांसारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण केले.
संगीत खुर्ची स्पर्धेत शशिकला अनिल वायदंडे यांनी प्रथम, जयश्री वाघमारे यांनी द्वितीय तर उमा सुरेश चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला. ‘बिन इट टू विन’ या खेळात मंगल काळे यांनी प्रथम तर महादेवी कांबळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. सापशिडी स्पर्धेत पुष्पलता ढाणक यांनी प्रथम, सलिमा सय्यद यांनी द्वितीय, आयशा शब्बीर डोंगरे यांनी तृतीय तर पल्लवी संदीप कोठाळकर यांनी चौथा क्रमांक मिळवला.
यावेळी मान्यवरांनी महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. नगरपरिषदेच्या वतीने सर्व महिला कामगारांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
Comments
Post a Comment