महाबळेश्वरमध्ये रोटरी क्लबचा सामाजिक उपक्रम; शाळेत कमर्शियल वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण, विद्यार्थिनीची फीही भरली

महाबळेश्वरमध्ये रोटरी क्लबचा सामाजिक उपक्रम; शाळेत कमर्शियल वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण, विद्यार्थिनीची फीही भरली

महाबळेश्वर प्रतिनिधी  –  दि. १४ मार्च २०२६ :

 समाजोपयोगी उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वरच्या वतीने येथील M.E.S. School मध्ये कमर्शियल वॉटर प्युरिफायरचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन सुधीर लातुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याच वेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शाळेतील एका गरीब व होतकरू विद्यार्थिनीची शैक्षणिक फी भरून सामाजिक बांधिलकीची जाणीवही रोटरी क्लबने दाखवून दिली.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थिनींनी बँड वाजवून मान्यवरांचे उत्साहपूर्ण स्वागत करत केली. त्यानंतर सरस्वती पूजनाचा कार्यक्रम रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय काळे व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे यांच्या हस्ते पार पडला. या उपक्रमांतर्गत बसविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण रोटरीचे प्रकल्प प्रमुख रो. ब्रिजभूषण सिंग व मनीष मुक्कवार, अध्यक्ष विजय काळे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे तसेच शाळेचे चेअरमन किशोर कोमटी आणि मुख्याध्यापिका शिला रसिया यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या वतीने गौरी कामळे मॅडम व रो. दिनेश भिसे यांनी केले. या प्रसंगी महेश कोमटी यांचीही उपस्थिती होती. सूत्रसंचालन रोटेरियन स्वाती भांगडिया यांनी केले. शाळेच्या वतीने चेअरमन किशोर कोमटी यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे यांचे स्वागत केले, तर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. राजगोपाल तापडिया व असिस्टंट गव्हर्नर दीपक बागडे यांचे स्वागत ज्येष्ठ पत्रकार संस्थेचे सेक्रेटरी संजय दस्तुरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिल्पा गुजर मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. या उपक्रमासाठी शिरीष गांधी, धीरेन नागपाल, महेश कोमटी, रमेश पलोड, अनंत कुमार कोमटी तसेच सर्व रोटरी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, सामाजिक क्षेत्रात रोटरी क्लबच्या कार्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl